.......... परोपकारी ! ...........
पोट स्वत:चे भरता वनस्पती विश्वाला जगवून जाते |
भरल्यापोटि मानवप्रगती का ईतरांचा घास ओढते ? || ध्रू .||
वसुंधरेच्या हाती ऊरती माती ज्याच्या अस्तित्वावीण |
नावच त्याचे " जीवन " कारण अशक्य हे जीवन पाण्यावीण |
प्राणवायुच्याशिवाय पण का हे पाणीहि जीवन ठरते ?
| भरल्यापोटि ... || 1 ||
जसा श्वास हृद्याला तशीच ऊर्जा आवश्यक सृष्टीला |
सहस्त्र किरणांतुनी जरी हा रवी विखुरतो ह्या ऊर्जेला |
सृष्टीच असती जर हाताविण दान तिच्या का हाती ऊरते ?
| भरल्यापोटि ... || 2 ||
दिला अर्थ सुर्याला अन जणू ह्या पाण्याला वनस्पतींनी |
सुर्याच्या ऊर्जेला सांधुन पर्णरूपी अनंत हातांनी |
प्राणवायु पाण्याचा गुंता त्या हातांनी हि सोडवते |
भरल्यापोटि ... || 3 ||
मंथन करते जणू पाण्याचे रेणूंच्या बंधास ऊलगडून |
करूनी मुक्त मग प्राणवायुला हायड्रोजनला धरते रोखुन |
कारण स्फोटक स्वभाव त्याचा वनस्पतीहि जाणून असते |
भरल्यापोटि ... || 4 ||
स्वभावसंसर्गाने होईल प्राणवायु विध्वंसक जाणून |
गिळूनी हायड्रोजन अन शोषुन कर्बवायुलाहि सृष्टीतुन |
विषास गिळता "वनस्पती" मग श्वास मोकळा "सृष्टी" घेते |
भरल्यापोटि ... || 5 ||
अमृत मिळते " विषास पचवून " जणू हे वनस्पतीला ऊमगुन |
गिळूंनी वायुंना ह्या मिसळून स्वभाव त्यांचा परस्परांतुन |
विषातुनी " ऊर्जेचे अमृत " विश्वाकरता हिच घडवते |
भरल्यापोटि मानवप्रगती का ईतरांचा घास ओढते || 6 ||
- मकरंद सुधाकर पाटोळे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा