मित्रांनो आपण पाहिले की 21वे शतक सुरू झाल्यापासून पृथ्वीचे तापमान झपाट्याने वाढत चालले आहे आणि तापमान वाढण्यासोबतच विश्वात हवामानाची भीषणताहि वाढु लागली आहे. मित्रांनो 1997 ते 2016 दरम्यानच्या दोन दशकात जगभरात भीषण हवामानाच्या एकुण 11,000 घटना घडल्या ज्यात 3.16 ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सचे आर्थिक नुकसान झाले. (1ट्रिलियन म्हणजे एकावर अठरा शुन्य) आणि ह्यात जगभरातील एकुण पाच लाख चौविस हजार लोकांचा बळी गेला. (हि बळींची अधिकृत संख्या आहे देशागणिक सत्य दडवण्याचे अनेक प्रकार घडतात आणि अश्या घटनांमध्ये मृतदेह न सापडणार्यांना बळी धरत नसल्याने हा आकडा त्याहून प्रचंड असु शकतो) सर्वात महत्वाचे म्हणजे श्रीमंत आणि प्रगत राष्ट्रांऐवजी 1997-2016 दरम्यान झालेल्या नैसर्गिक आपत्तींचा फटका गरीब आणि विकसनशील देशांना बसला. ज्यात श्रीमंतांपेक्षा कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब व्यक्तींचे म्हणजेच अल्प ऊत्पन्न गटातील व्यक्तींचे प्रमाण प्रचंड असते. आपल्यासाठी दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ह्या देशांमध्ये पाकिस्तान आणि बांग्लादेशच्या मांडीला मांडी लावून (फेसबुक-व्हॉट्स ॲपच्या पोस्ट्समध्येचीनहून वरचढ ठरणारा) आपला भारतहि आहे. तज्ञ आणि वैज्ञानिकांच्यामते ग्लोबल वॉर्मिंगने ऊत्तरोत्तर अधिक भीषण होत जाणार्या हवामानाच्या काळात जगभरात (पुर,वादळ,चक्रिवादळ,ऊष्णतेच्या भीषण लाटा,दुष्काळ ई.) अश्या रौद्र घटनांचे प्रमाण वाढुन त्या घटनांची भीषणताहि अधिक वाढण्याने भारतासारख्या देशांना निकट भविष्यात मोठ्या नैसर्गिक आपत्तींसाठी सज्ज रहावे लागु शकते. [मित्रांनो विकसनशील देश आणि त्यातील श्रीमंत व्यक्तींना त्यांच्या संपत्तीमुळे तीव्र ऊन्हाळा, कडाक्याची थंडी, चक्रिवादळ,पुर अश्या नैसर्गिक आपत्तींना ऊत्तम पध्दतीने तोंड देता येते. पण भारतासारख्या देशाला आणि ईथल्या गरीब जनतेसाठी त्याच नैसर्गिक आपत्ती महाप्रलयाप्रमाणे ठरतात हे आपण मुंबईच्या 26 जुलै आणि ऊत्तराखंडच्या महापुराच्यावेळेस पाहिले. त्यामुळेच एकीकडे हवामानातील छोटासा बदल किंवा एखादि हवामानाची चक्रिवादळाची रौद्र घटना जिथे आपल्या नागरिकांचे आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडू शकते त्याचवेळेस श्रीमंत प्रगत राष्ट्रांसाठी जीवावरचे संकटहि हाताच्या बोटांवर निभावू शकते. ऊदा. जपानला वर्षातुन जवळपास डझनभर चक्रिवादळांचा तडाखा बसतो. त्यातील काहि तर भारतातल्या 1999 सालच्या सुपर सायक्लॉनईतकी भीषण असतात. पण तरीहि जपान आणि तिथली जनता त्यासाठी सज्ज असल्याने ह्या जख्मा झटकन भरून ते पुढिल आघात झेलण्यास सज्ज असतात. ह्या वादळांमुळेच जपानमध्ये जगातील सर्वात प्रशस्त गटारव्यवस्था आहे ज्याला स्टॉर्म वॉटर ड्रेनेज सिस्टीम म्हणतात. ह्या विशाल गटारांची रूंदि महामार्गाईतकी असुन ऊंची टोलेजंग ईमारतीएव्हढि आहे. चक्रिवादळाच्यावेळेस हि गटार पावसाच्या प्रचंड पाण्याला साठवतात ज्याला त्याचवेळेस मोठमोठ्या पंपांनी नदि,समुद्रात फेकले जाते. ह्यामुळे वादळातहि शहरांमध्ये पुरस्थिती ऊद्भवत नाहि आणि वादळानंतर लगेचच शहर पुर्वस्थितीत असते. त्याऊलट भारतातील गटार आजहि 100 वर्षांपुर्वीची ईंग्रजांच्या काळातील त्यांनी बांधलेली आहेत. (स्वदेशी राष्ट्रवादाला हे पचणे सर्वात मोठे आश्चर्यच आहे.) ज्यांची क्षमता एका तासात फक्त 25 मि.मी पावसाला झेलण्याईतकीच आहे. जी त्या काळात योग्य होती पण आजच्या काळात जगातील सर्वात मोठा विनोद आहे. त्यामुळेच 26 जुलैला सर्व जगासमोर देशाचा विनोद झाला जेंव्हा "हि गटार बदलण्याची गरज नाहि का ?" ह्या प्रश्नावर त्यावेळेचे मुंबईतील एक ऊच्चाधिकारी म्हणाले की "वर्षातुन दोन-तीन वेळा पडणार्या पावसासाठी नवी गटार बांधुन कोट्यावधींचा खर्च करण्याची गरजच काय ?" खरच आपण महान आहोत.] असो तर मित्रांनो वरील भविष्यवाणीचा अनुभव भारत एक दोन दशकांपासून घेतच आहे पण त्यातहि फक्त 2016 चाच विचार करता ह्या एका वर्षात विविध भीषण घटनातुन समोर आलेल्या हवामानाच्या ह्या रौद्रावतारामुळे देशात 2,119 जणांचे बळी गेले. (अधिकृत आकडा ज्यात वास्तवाहून बरीच तफावत असु शकते) आणि 21 अब्ज अमेरिकी डॉलर्स एव्हढ्या प्रचंड संपत्तीचे नुकसान झाले. मित्रांनो हे नुकसान भारताच्या एकुण अर्थव्यवस्थेच्या म्हणजेच बजेटच्या 1% ईतके असुन प्रत्यक्षात हा आकडा भारताकडून आरोग्यक्षेत्रावर होणार्या खर्चाच्या जवळपास आहे. मित्रांनो काय विचित्र स्थिती आहे पहा गरीबी,सरकारी हॉस्पिटल्स आणि त्याबाबतची सरकार - प्रशासनाची अनास्था त्याचवेळेस वैद्यकीय क्षेत्रातील बाजारीकरण ह्यामुळे देशात दरवर्षी लक्षावधी माणस जनावरांप्रमाणे (प्रत्यक्षात आज त्यांची स्थिती माणसांहून ऊत्तम आहे) मरत असताना भरीस भर म्हणून एकीकडे बदलत्या हवामानामुळे रोगराई,आजारपणाचे प्रस्थ वाढत चालल असताना एकीकडे सरकारकडून आरोग्यावरील खर्चात भरभक्कम वाढ होणे अपेक्षित असताना ह्या हवामानसंबंधी दुर्घटनांमध्ये देशाची एकुण हेल्थ बजेटईतक्याच संपत्तीची होळी झाली. मित्रांनो त्याहून मोठे दुर्दैव हे की अमेरिकेच्या अध्यक्षपदि बसलेल्या डोनाल्ड ट्रम्प नावाच्या एका व्यक्तीमुळे ह्यापुढे भारतासारख्या देशांवर येऊ शकणार्या संकटाची कल्पनाहि करवत नाहि. ह्याच कारण आत्ताच ICU मध्ये असणार्या आपल्या पृथ्वीला वाचवण्यासाठी मानवाच्याहाती मोजून दहा-पंधरा वर्षांचाच कालावधी आहे. (कारण काहि शास्त्रज्ञांच्यामते त्यानंतर ग्लोबल वॉर्मिंगची स्थिती मानवाच्या शक्ती पलीकडे गेल्याने त्यापुढे पृथ्वीस वाचवण्यासाठी मानवाच्याहाती काहिच रहाणार नाहि.) आणि ह्यावर ऊपाय म्हणून प्रगत आणि विकसनशील देशांनी आपापल्या प्रदुषणावर मोठ्या प्रमाणात नियंत्रण आणण्यासारखी पावल खुप वेगाने ऊचलण्याची गरज आहे. पण नेमक्या अश्यावेळेस जगातील दुसर्या क्रमांकाचा देश असणार्या अमेरिकेच्या ह्या राष्ट्रपतींनी आपली सर्व जबाबदारी झटकून (जगाच्या हितासाठी बराक ओबामांनी मान्य केलेल्या अटी-शर्ती लाथाडून) ग्लोबल वॉर्मिंगच्या युध्दातून सपशेल माघार घेतली आहे. म्हणजेच ह्यापुढे प्रदुषण थांबवण्यासाठी 1% हि मदत न करता आता अमेरिका नवीन ऊत्साहाने कैकपटीने प्रदुषण करू लागेल. मित्रांनो त्याचा तापमानवाढ,हवामानबदल आणि एकुणच भारतावर काय परिणाम होऊ शकतो ह्याची कल्पना तुम्ही करू शकता. मित्रांनो अस म्हणतात जो संकटसमयी मदत करतो तोच मित्र आणि संकटसमयी घात करणारा क्षत्रूहुनहि भयानक असतो. हे ट्रम्प साहेब आणि आपले पंतप्रधान मोदिजींची मैत्री जगजाहिर आहे. त्यामुळेच मोदि साहेबांनी ह्याबाबतचा निर्णय बदलण्यासाठी ट्रम्प साहेबांना समजावण्याचे भगीरथ प्रयत्न करणे गरजेचे आहे. आणि असे झाल्यास त्यानंतर ट्रम्प त्यांचे म्हणजेच पर्यायाने भारताचे मित्र आहेत की कोण ते कळेल. मी असे म्हणतोय कारण मित्रांनो ग्लोबक वॉर्मिंगच्या युध्दात भारताच्या आणि जगाच्याहि दृष्टीने अमेरिकेची भुमिका खुप महत्वाची आहे. कारण ग्लोबल वॉर्मिंगचा हा राक्षस बनवण्यात सर्वात मोठा वाटा अमेरिकेचाच आहे. पण ह्या युध्दात अमेरिकेची ती भुमिका कोणती ?
क्रमश :
- मकरंद सुधाकर पाटोळे.
क्रमश :
- मकरंद सुधाकर पाटोळे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा