वास्तव !

वास्तव !

शनिवार, ७ मे, २०१६

....... // घड्याळ \\ …….

               

वेळ  सांगते  घड्याळ  की  ह्या  विश्वातील  सत्याचे  सार |

घड्याळात  पहाताना  करूया  आपण  ह्याचा  जरा  विचार  ||धृ.||

जणू  सत्याचे  भान  हरवूनी  चित्त  वेधण्या  ऊनाड  धडधड  |

पुढे  राहण्यासाठी  केवळ सुरूच  ज्याची  बाष्कळ  धडपड  |

सेकंद  काट्याच्या  वृत्तीचे  विवेकबुध्दीशी  जणू  वैर  |           घड्याळात … || 1 ||

ठाम  स्वत: जो  निर्धारावर  नसे  भय  त्याला  स्पर्धेचे  |

पाऊल  त्याचे  भान  देऊनी  जाते  विश्वाला  काळाचे  |

म्हणूनी  करते  जणू  बुध्दीहि  मिनिटाच्या  काट्याचा  आदर  | घड्याळात… || 2 ||

शर्यतीत  ह्या  मागे  जो  तो  अढळ  आपुल्या  ध्येय्यावरती  |

तार्यासम  तो  कारण  फिरते  विश्वची  अवघे  ह्याच्याभोवती  |

ठसा  ऊमटवून  जाते  अपुला  कोण  ह्यातले  मग  विश्वावर  ?

घड्याळात… || 3 ||

त्रिकोण  काट्यांचा  आवश्यक  तोल  साधण्यासी  काळाचा  |

हात  पकडण्या  ह्या  काळाचा  वारू  आवश्यक  प्रगतीचा  |

ऊधळून  घोडा  पण  मग  झाले  कोण  आज  कोणावर  स्वार  ?

घड्याळात  पहाताना  करूया  आपण  ह्याचा  जरा  विचार  || 4 ||

- मकरंद  सुधाकर  पाटोळे  कदम.

.......शंकाग्रस्त बीज !........

जीवनदायी  रक्षणकर्त्यांचा  जर  घातच    प्रघात  ईथला |

ईतरांसाठी  विशाल  होऊ  का  मी  कवटाळून  मृत्युला ? || धृ.||

क्षितीजाचेहि  नसते  बंधन  शापित  भूमी  अथांग  ऐशी  |

रक्त  जळून  छायेवीण  जिकडे  सांगाड्यांच्या  अगणित  राशी  |

अनंत  वर्षे  शाप  भोगुनी  फुटे  पालवी  मग  धरणीला  | ईतरांसाठी ...|| 1 ||

करूणामयी  मग  रोप  ऊगवते  हिमालयाचे  धैर्य  अंतरी  |

वार  झेलुनी  ते  सृष्टीचे  रोप  पसरते  परोपकारी  |

श्वास  पाहूनी  तडफडणारे  रोप  घडविते  वटवृक्षाला | ईतरांसाठी ...|| 2 ||

छाया  ह्याची  बनते  घरकुल  जणू  श्वास  हा  प्रत्येकाचा  |

मरूभुमीतील  तृष्णेसाठी  जणू  निर्झर   हा  चैतन्याचा  |

कल्पवृक्ष  हा  आनंदाचा का   खुपतो  मग  त्या  दैवाला ?  ईतरांसाठी ...|| 3 ||

झंझावाती  येऊन  तांडव  प्रलयमेघ  त्या  नभास  गिळूनी  |

थरथरती  मग  दहा  दिशा हि  ईथे  दामिनींच्या  नृत्यानी  |

ढाल  बनवूनी  तरू  स्वत:सी  धरतो  हृद्यी  प्रत्येकाला  | ईतरांसाठी ...|| 4 ||

निर्भय  ऊंच  तरू  हा  पाहून  अहं  ठेंगणा  नभी  विजेचा  |

नखशिखान्त  पेटूनी  दामिनी  प्राण  जाळूनी  जाते  ह्याचा  |

बीज हि  जळते  जमिनीमध्ये  प्रश्न  विचारून  हाच  स्वत:ला  |

ईतरांसाठी  विशाल  होऊ  का  मी  कवटाळून  मृत्युला ? || 5 ||

- मकरंद सुधाकर पाटोळे कदम.

......// वैषम्याची छाया \\……



सौंदर्याची   किनार  असते  "सीमा"  भीषण  अंधकुपाची  | 

"माध्यम" युगात  राहून  जाणीव  परि  नाहि  का  ह्या  सत्याची  ?
|| धृ. ||

क्षितीजावर  रंगांची  धुळवड  पहाट   स्वप्नाला  रंगवते  |

अस्तित्वावीण  "त्याच्या"  परि  जिकडे  हि  "तिचीच"  होळी  जळते   |

तिथे  स्वयं   तेजाला  खेटून  असते   सत्ता  अंधाराची  || "माध्यम" युगात || 1 || 


सुर्याच्या  तेजाला  ईच्छा  जरी  अंधाराला  गिळण्याची  |

प्रखर  तेज  धरण्या  किरणांचे  नसुन  ओंजळी  "त्या"  हातांची  |

तेज  रवीचे  ईथे  जाळते  दिप्ती  नेत्रातील  ज्योतींची  || "माध्यम" युगात || 2 ||


अंधकुपागत  मिजास  "येथे"  दगडाच्या  ईवल्या  छायेला  |

पर्वत , गर्दवनांच्या  कुशीत  अभयदान  परी  त्या  भुमीला  |

तेज  विखरूनी  रवीचे  जिकडे  "हुळहुळ"  "त्याच्या  अस्तित्वाची" |
"माध्यम" युगात || 3 ||


"जी"  तेजाने  न्हाऊन  निघते  तिचे  अंग  ते  तेज  पोळते  |

मगरमिठीतील  तिमीराच्या  भुमीचा  "हिमयुग"  श्वास  कोंडते  |
 

ईथे  ओढ  नसते  "त्याच्यावीण"  विषमतेस  ह्या  समानतेची  || "माध्यम" युगात || 4 ||


"जळून - गोठणे" भुमीची  जणू  दिनचर्या  त्या  ऋतुचक्रावीण  |

नंदनवन  "ती"  आघातांचे   त्याच्या  मायेच्या  "छत्राविण"  |

झेलून  अनंत  आघातांना  करी  राख  "जे" पाषाणांची  || "माध्यम" युगात || 5 ||
 

ईवलीशी  मग  ऊल्का  पाहते  तुच्छपणाने   ह्या  भुमीला  |

"रान  मोकळे" पाहून  चढते  बळ  मग  ऊल्केतील  क्रौर्याला  |

अनंत  काळे  डाग  सांगती  जणू   कहाणी  त्या  "वारांची"  ||
"माध्यम" युगात || 6 ||



आघातांना  पचवून  आशा  भुमीला  तरी  जणू  "ऊद्याची"  |

नभी  "शांतीचा"  रंग  भरे  जो  वाट  पहाता  त्या  दिवसाची  |

"रात  ढळे  ना  परि  गगनातील"   नभात  सत्ता  जरी   सुर्याची  || "माध्यम" युगात || 7 ||


"कर्करोग"  झिरपे   तेजातुन  कुणा  जाण  का  ह्या  सत्याची  ?

संवेदनाच  नसता  येथे   गर्दि    "शोभेच्या"   दगडांची  |

कारण   "चांद्रभुमी" हि  नसते  साथ  जिला  "वातावरणाची" |

"माध्यम" युगात  राहून  जाणीव  परि  नाहि  का  ह्या  सत्याची  ?   

-  मकरंद  सुधाकर  पाटोळे  कदम.









............पडछाया !.............




















दडे घराच्या स्वप्नामागे 'काळी छाया'
का मृत्युची ?
कारण हि तर असते
किमया त्या 'सोयीच्या' अंधत्वाची ||
धृ.||
विस्तारत जाता जनसंख्या महानगरांतून
'स्वप्नांसोबत' |
गगनी भिडती ईमारती मग 'नियमांना'
भूमीवर चिरडत |
ईमारतींचे अरण्य हे कि पिढी 'ऊंच
झोपडपट्ट्यांची ?' | कारण...||1||
बांधकाम दर्जाची 'हत्या' होते 'लिंपून'
ईमारतींना |
ऊब सुरक्षित दिसुनी ह्यातून
परी त्या 'अजाण' निष्पाप्यांना |
'आयुष्याची मिळकत' देऊन करत
'खरेदी शवपेट्यांची'| कारण...||2||
डगमगल्या ना 'नियम' ठेचता अखेर
'भयकंपित' त्या दिवशी |
ईमारतींना कारण कळते गाठ आज
'धरणीकंपाशी' |
'गलितगात्र' ह्या ईमारती मग काढित
आठवण त्या 'नियमांची' |
कारण...||3||
जो तो बिथरून पाखरूच मग पाहून
'थरथरणारे घरटे' |
मृत्युमुखी टाकूनी पळाला 'तोल'
पाहूनी धडपड खुंटे |
'स्वप्नांची' सावलीच कळते
होती छाया 'अपमृत्युची' | कारण...||4||
रहिवाश्यांना दिसूनी भिंती 'दोन
भुजांगत अडकित्त्याच्या' |
आदळती ह्या भिंतींमधूनी 'मुर्त्या जिवंत
हतबलतेच्या' |
हृद्य भंगते आधी ज्यांचे पाहत 'पडझड'
हृद्यस्थांची | कारण...||5||
'पत्त्यांचे बंगले' कोसळता अखेर 'गाडून'
रहिवाश्यांना |
भाग्यवान का सुटले ह्यातून 'क्षणात'
गमवून जे प्राणांना ? |
जिथे 'वेदनाही' कळवळते पाहून घुसमट
ह्या श्वासांची | कारण...||6||
असहाय्य तळमळणारे कोणी भीक
मागता मग मृत्युची |
स्वत:च त्या 'मृत्युला'
हुंदका म्हणता 'धरा कास आशेची' |
जिथे पिळ
त्याच्या हृद्याला करा कल्पना मग
स्वकियांची | कारण...||7||
द्यामरण जो कुणास देतो कुणा श्वास
का गुदमरण्याला ? |
प्रशासनाच्या मदतीची जणू विलंब
होऊन आशा त्याला |
नंतरच्या धक्क्यांनी जाते चिरडून
आशा त्या मृत्युची | कारण...||8||
स्वकीयांच्याही हृद्यी आशा परी 'थरथरती'
स्वत: भयाने |
खोल हरवूनी डोळे त्यातील
पाणी 'विचलीत' ह्या प्रश्नाने |
ठरू ऊब ओघळताना की रेघ ठरू निर्द्य
चटक्याची ? | कारण...||9||
ढिगारेच मग उपसून निघते त्यातून
'आशा कुणा निराशा ' |
पुनर्जन्म तर कोठे तडफड कुणा गिळून
जाती दहा दिशा |
कुणा रेघ अश्रुंची 'पोळून' 'ऊब'
कुणा आनंदाश्रुंची | कारण...||10||
स्वार्थ आंधळा सुरुंगास
ह्या जरी रचुनी 'निर्माणावेळी' |
'भुकंपास' ठरवून आरोपी ठसवून 'एकच बाजू
काळी' |
'स्वार्थ' मोकळा पुन्हा घालण्या फुंकर
खोटी आपुलकीची | कारण...||11||
मदतीच्या हातालाही त्या जणू दृष्ट
त्या 'दुष्ट' प्रथेची |
बनवून 'याचक' ज्यात रडविते पिडीतांस
'छाया' आशेची |
जगलेल्यांचा 'जन्म' चिरडतो वाहत
'ओझी' ऊपचारांची |
कारण ही तर असते
किमया त्या 'सोयीच्या' अंधत्वाची ||
12||
- मकरंद सुधाकर पाटोळे कदम.

.............मातृत्व !.............








...........मातृत्व..­.............




पाहून इवला जीव चेव
त्या गर्दीच्या झंझावाताला |


नेत्रातील 'थरथरती'
ज्योती शोधत
असता त्या 'हाताला' ||धृ.||




तळपत होता सूर्य शिरावर पेटवूनी भूमी वैराण |


कळप मृगांचा 'निष्ठूर' सोडून मागे ती हरिणी गतप्राण |


पाडस परी अडखळले मागे पाहून निपचीत त्या मातेला | नेत्रातील...||1
||



जीव भुकेने व्याकुळ त्याचा अजाण बिलगे तिच्या शवासी |


मायेचा तो 'पाझर' परिचीत
का परका ?
ना कळूनी त्यासी |


ऊब
शोधूनी ना सापडली 'मायेची' परी त्या पिल्लाला | नेत्रातील ...||2||




'मृत्यू हुंगून' येत गिधाडे पाडसास हुसकविले त्यांनी |


शवास वेढून लचके तोडून जणू 'ममतेसी'
गेली गिळूनी |


पाहूनीच गहिवरले पिल्लू मग 'मायेच्या'
सांगाड्याला | नेत्रातील...||3||



मातेवीण पोरके हरवले एकांती हे पाहून
पाडस |


'मृत्यूला' रुपात चित्त्याच्या हमला करण्याचे मग धाडस |


आळवित असता मातेला मृत्यू गिळूनी ह्या पिल्लाला | नेत्रातील ....||4||




कुठे ऊपाशी तळमळणार्या पिल्लाने मातेसी हळहळ |


सिंहांच्या गर्जना सभोवती परी जिंकून हृद्यातील तळमळ |


आली सोपवूनी ते पिल्लू
'आई'
बिबट्याची झाडाला | नेत्रातील...||5||




दृष्टीआड तिज होता पिल्लू सिंहांची 'कुदृष्टी' तिजवर
|



'स्पर्धक' समजून
ह्या मातेला हल्ला हिंसक मग 'ममतेवर' |


रक्ताच्या थारोळी 'स्पंदन' विझले आठवूनी 'बाळाला' | नेत्रातील...||6||





पिल्लाची मग हाक
होऊनी इथे
'पोरकी' प्रतिसादावीण |


मातेसी शोधण्या भटकता ऊघड्यावरती हे छायेवीण |


कुत्र्यांनी मग त्यास वेढूनी लाजविले
त्या 'निर्द्यतेला' | नेत्रातील...||7||




दूरचित्रवाणीवर भयाण
ह्या सत्याला स्वत: पाहूनी |


रडे माय 'बाळावीण'
आशा जिला लावली विज्ञानानी |


वाचा फुटली मग
तिच्यातल्या त्या रडणार्या 'मातृत्वाला'| नेत्रातील...||8||




"प्रेम-भावना परक्या म्हणतो आपण ह्या प्राणीजगताला |


परी 'ममतेचा श्वास'
जगवितो ह्या पिल्लांच्या 'अस्तित्वाला' |


मानवात म्हणूनी तर आई नावच दुसरे 'मातृत्वाला'| नेत्रातील...||9||




जीव जिचा त्या बाळामध्ये 'श्वासासम'
त्या हृद्यी धरूनी |


दु:खाच्या चटक्याला जाते हिचीच फुंकर
'शीतल' करूनी |


कोलमडूनी पडता स्पर्शातून देते बळ ह्याच्या 'धैर्याला' | नेत्रातील ...|| 10||




'पिल्लाची वेदना'
सांगती व्रण खोल
तिच्याच 'हृद्याचे' |


रोग हरे जी बाळाचा त्या स्वास्थ्य अर्पूनी त्यास 'स्वत:चे' |


साद स्पंदनाची गुदमरते 'ह्याची'
मुकुनी 'प्रतिसादाला' | नेत्रातील...||1
1||




बळ पंखातील वाढून
ऊडूनी मागे सारून
त्या क्षितीजाला |


जरी पिल्लाचे हृद्य विसरले मायेच्या मंजुळ हाकेला |


परी 'आईचा'
श्वासही 'अंतिम' साद
घालूनी जातो ह्याला | नेत्रातील...||1
2||


.
'साद' कुठे
इवल्या हृद्याची आईच्या हृद्याला 'बिलगून' |


धडकी भरणार्या बुरूजाला गेली आई 'थिटेच' ठरवून |


'अहंकार' गळला बुरूजाचा पाहून 'ममतेतील शक्तीला' | नेत्रातील...||13||





म्हणूनी लक्ष माता- भगिनींची जडली ज्यांच्या ठायी भक्ती |


स्वत: त्याच शिव
छत्रपतींनी ममतेतील ऊलगडण्या शक्ती |


हिचे नाव देऊन बुरुजाला केले वंदन ह्या 'ममतेला' |नेत्रातील...||14||




वसे तीच
ममता स्त्री हृद्यी जी बाळावीण कधी 'पोरकी' |


'हाक'
अनाथालयातल्या त्या बाळांची तिज नव्हती 'परकी' |


मिळे 'ऊब मायेची' मग
त्या थरथरत्या इवल्या पिल्लाला |
नेत्रातील...||15||




'विज्ञानाचे हात' अर्पिता रक्ताचे नाते त्या स्त्रीला |


अनाथ बाळाचा का 'टाहो' ध्वनीत ह्या 'प्रगतीच्या' दबला ? |


'हरिणाच्या पिल्लासम' का मग आज दिशा ह्या गिळतील ह्याला ?| नेत्रातील...||16||




'बिबट्याच्या पिल्लासम' हरवून इथे मुकुन त्या 'प्रतिसादाला' |


केविलवाणे ठरून गिळेल का 'निर्द्यता' ह्या बाळाला ? |


हृद्यी भिडेल कधी हाक
की ह्या 'आधूनिक
हिरकणीला' ? |
नेत्रातील...||17||




'आप-पर'
भावाची दरी ती हिचे
पाय
का ओढिल मागे ?|


थिटी ठरवूनी जाईल
दरीस कि जुळवून
'मायेचे धागे' ? |


मिळेल का 'प्रेमाचा' पाझर ह्या 'व्याकुळलेल्या' पिल्लाला ? |" नेत्रातील...||18||





हृद्यामधल्या 'मातृत्वाच्या' ह्या प्रश्नांनी विचलीत होऊन |


दूरून 'पोरक्या' बाळाची मग साद 'हिला' गेली हेलावून |


'अपुले-परके' दरी मध्ये
जी दिसली 'क्षूल्लक
ह्या आईला'|


नेत्रातील 'थरथरती'
ज्योती शोधत
असता त्या 'हाताला' ||19||




-मकरंद सुधाकर पाटोळे कदम.