सौंदर्याची किनार असते "सीमा" भीषण अंधकुपाची |
"माध्यम" युगात राहून जाणीव परि नाहि का ह्या सत्याची ?
|| धृ. ||
क्षितीजावर रंगांची धुळवड पहाट स्वप्नाला रंगवते |
अस्तित्वावीण "त्याच्या" परि जिकडे हि "तिचीच" होळी जळते |
तिथे स्वयं तेजाला खेटून असते सत्ता अंधाराची || "माध्यम" युगात || 1 ||
सुर्याच्या तेजाला ईच्छा जरी अंधाराला गिळण्याची |
प्रखर तेज धरण्या किरणांचे नसुन ओंजळी "त्या" हातांची |
तेज रवीचे ईथे जाळते दिप्ती नेत्रातील ज्योतींची || "माध्यम" युगात || 2 ||
अंधकुपागत मिजास "येथे" दगडाच्या ईवल्या छायेला |
पर्वत , गर्दवनांच्या कुशीत अभयदान परी त्या भुमीला |
तेज विखरूनी रवीचे जिकडे "हुळहुळ" "त्याच्या अस्तित्वाची" |
"माध्यम" युगात || 3 ||
"जी" तेजाने न्हाऊन निघते तिचे अंग ते तेज पोळते |
मगरमिठीतील तिमीराच्या भुमीचा "हिमयुग" श्वास कोंडते |
ईथे ओढ नसते "त्याच्यावीण" विषमतेस ह्या समानतेची || "माध्यम" युगात || 4 ||
"जळून - गोठणे" भुमीची जणू दिनचर्या त्या ऋतुचक्रावीण |
नंदनवन "ती" आघातांचे त्याच्या मायेच्या "छत्राविण" |
झेलून अनंत आघातांना करी राख "जे" पाषाणांची || "माध्यम" युगात || 5 ||
ईवलीशी मग ऊल्का पाहते तुच्छपणाने ह्या भुमीला |
"रान मोकळे" पाहून चढते बळ मग ऊल्केतील क्रौर्याला |
अनंत काळे डाग सांगती जणू कहाणी त्या "वारांची" ||
"माध्यम" युगात || 6 ||
आघातांना पचवून आशा भुमीला तरी जणू "ऊद्याची" |
नभी "शांतीचा" रंग भरे जो वाट पहाता त्या दिवसाची |
"रात ढळे ना परि गगनातील" नभात सत्ता जरी सुर्याची || "माध्यम" युगात || 7 ||
"कर्करोग" झिरपे तेजातुन कुणा जाण का ह्या सत्याची ?
संवेदनाच नसता येथे गर्दि "शोभेच्या" दगडांची |
कारण "चांद्रभुमी" हि नसते साथ जिला "वातावरणाची" |
"माध्यम" युगात राहून जाणीव परि नाहि का ह्या सत्याची ?
- मकरंद सुधाकर पाटोळे कदम.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा