वास्तव !

वास्तव !

मंगळवार, ५ जून, २०१८

मित्रांनो आपण पाहिले की 21वे शतक सुरू झाल्यापासून पृथ्वीचे तापमान  झपाट्याने वाढत चालले आहे आणि तापमान वाढण्यासोबतच विश्वात हवामानाची भीषणताहि वाढु लागली आहे. मित्रांनो 1997 ते 2016 दरम्यानच्या दोन दशकात जगभरात भीषण हवामानाच्या  एकुण 11,000 घटना घडल्या ज्यात 3.16 ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सचे आर्थिक नुकसान झाले. (1ट्रिलियन म्हणजे एकावर अठरा शुन्य) आणि ह्यात जगभरातील एकुण पाच लाख चौविस हजार लोकांचा बळी गेला. (हि बळींची अधिकृत संख्या आहे देशागणिक सत्य दडवण्याचे अनेक प्रकार घडतात आणि अश्या घटनांमध्ये मृतदेह न सापडणार्यांना बळी धरत नसल्याने हा आकडा त्याहून प्रचंड असु शकतो) सर्वात महत्वाचे म्हणजे श्रीमंत आणि प्रगत राष्ट्रांऐवजी 1997-2016 दरम्यान झालेल्या नैसर्गिक आपत्तींचा फटका गरीब आणि विकसनशील देशांना बसला. ज्यात श्रीमंतांपेक्षा कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब व्यक्तींचे म्हणजेच अल्प ऊत्पन्न गटातील व्यक्तींचे प्रमाण प्रचंड असते. आपल्यासाठी दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ह्या देशांमध्ये पाकिस्तान आणि बांग्लादेशच्या मांडीला मांडी लावून (फेसबुक-व्हॉट्स ॲपच्या पोस्ट्समध्येचीनहून वरचढ ठरणारा) आपला भारतहि आहे. तज्ञ आणि वैज्ञानिकांच्यामते ग्लोबल वॉर्मिंगने ऊत्तरोत्तर अधिक भीषण होत जाणार्या हवामानाच्या काळात जगभरात (पुर,वादळ,चक्रिवादळ,ऊष्णतेच्या भीषण लाटा,दुष्काळ ई.) अश्या रौद्र घटनांचे प्रमाण वाढुन त्या घटनांची भीषणताहि अधिक वाढण्याने भारतासारख्या देशांना निकट भविष्यात मोठ्या नैसर्गिक आपत्तींसाठी सज्ज रहावे लागु शकते. [मित्रांनो विकसनशील देश आणि त्यातील श्रीमंत व्यक्तींना त्यांच्या संपत्तीमुळे तीव्र ऊन्हाळा, कडाक्याची थंडी, चक्रिवादळ,पुर अश्या नैसर्गिक आपत्तींना ऊत्तम पध्दतीने तोंड देता येते. पण भारतासारख्या देशाला आणि ईथल्या गरीब जनतेसाठी त्याच नैसर्गिक आपत्ती महाप्रलयाप्रमाणे ठरतात हे आपण मुंबईच्या 26 जुलै आणि ऊत्तराखंडच्या महापुराच्यावेळेस पाहिले. त्यामुळेच एकीकडे हवामानातील छोटासा बदल किंवा एखादि हवामानाची चक्रिवादळाची रौद्र घटना जिथे आपल्या नागरिकांचे आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडू शकते त्याचवेळेस श्रीमंत प्रगत राष्ट्रांसाठी जीवावरचे संकटहि हाताच्या बोटांवर निभावू शकते. ऊदा. जपानला वर्षातुन जवळपास डझनभर चक्रिवादळांचा तडाखा बसतो. त्यातील काहि तर भारतातल्या 1999 सालच्या सुपर सायक्लॉनईतकी भीषण असतात. पण तरीहि जपान आणि तिथली जनता त्यासाठी सज्ज असल्याने ह्या जख्मा झटकन भरून ते पुढिल आघात झेलण्यास सज्ज असतात. ह्या वादळांमुळेच जपानमध्ये जगातील सर्वात प्रशस्त गटारव्यवस्था आहे ज्याला स्टॉर्म वॉटर ड्रेनेज सिस्टीम म्हणतात. ह्या विशाल गटारांची रूंदि महामार्गाईतकी असुन ऊंची टोलेजंग ईमारतीएव्हढि आहे. चक्रिवादळाच्यावेळेस हि गटार पावसाच्या प्रचंड पाण्याला साठवतात ज्याला त्याचवेळेस मोठमोठ्या पंपांनी नदि,समुद्रात फेकले जाते. ह्यामुळे वादळातहि शहरांमध्ये पुरस्थिती ऊद्भवत नाहि आणि वादळानंतर लगेचच शहर पुर्वस्थितीत असते. त्याऊलट भारतातील गटार आजहि 100 वर्षांपुर्वीची ईंग्रजांच्या काळातील त्यांनी बांधलेली आहेत. (स्वदेशी राष्ट्रवादाला हे पचणे सर्वात मोठे आश्चर्यच आहे.) ज्यांची क्षमता एका तासात फक्त 25 मि.मी पावसाला झेलण्याईतकीच आहे. जी त्या काळात योग्य होती पण आजच्या काळात जगातील सर्वात मोठा विनोद आहे. त्यामुळेच 26 जुलैला सर्व जगासमोर देशाचा विनोद झाला जेंव्हा "हि गटार बदलण्याची गरज नाहि का ?" ह्या प्रश्नावर त्यावेळेचे मुंबईतील एक ऊच्चाधिकारी म्हणाले की "वर्षातुन दोन-तीन वेळा पडणार्या पावसासाठी नवी गटार बांधुन कोट्यावधींचा खर्च करण्याची गरजच काय ?" खरच आपण महान आहोत.] असो तर मित्रांनो वरील भविष्यवाणीचा अनुभव भारत एक दोन दशकांपासून घेतच आहे पण त्यातहि फक्त 2016 चाच विचार करता ह्या एका वर्षात विविध भीषण घटनातुन समोर आलेल्या हवामानाच्या ह्या रौद्रावतारामुळे देशात 2,119 जणांचे बळी गेले. (अधिकृत आकडा ज्यात वास्तवाहून बरीच तफावत असु शकते) आणि 21 अब्ज अमेरिकी डॉलर्स एव्हढ्या प्रचंड संपत्तीचे नुकसान झाले. मित्रांनो हे नुकसान भारताच्या एकुण अर्थव्यवस्थेच्या म्हणजेच बजेटच्या 1% ईतके असुन प्रत्यक्षात हा आकडा भारताकडून आरोग्यक्षेत्रावर होणार्या खर्चाच्या जवळपास आहे. मित्रांनो काय विचित्र स्थिती आहे पहा गरीबी,सरकारी हॉस्पिटल्स आणि त्याबाबतची सरकार - प्रशासनाची अनास्था त्याचवेळेस वैद्यकीय क्षेत्रातील बाजारीकरण ह्यामुळे देशात दरवर्षी लक्षावधी माणस जनावरांप्रमाणे (प्रत्यक्षात आज त्यांची स्थिती माणसांहून ऊत्तम आहे) मरत असताना भरीस भर म्हणून एकीकडे बदलत्या हवामानामुळे रोगराई,आजारपणाचे प्रस्थ वाढत चालल असताना एकीकडे सरकारकडून आरोग्यावरील खर्चात भरभक्कम वाढ होणे अपेक्षित असताना ह्या हवामानसंबंधी दुर्घटनांमध्ये देशाची एकुण हेल्थ बजेटईतक्याच संपत्तीची होळी झाली. मित्रांनो त्याहून मोठे दुर्दैव हे की अमेरिकेच्या अध्यक्षपदि बसलेल्या डोनाल्ड ट्रम्प नावाच्या एका व्यक्तीमुळे ह्यापुढे भारतासारख्या देशांवर येऊ शकणार्या संकटाची कल्पनाहि करवत नाहि. ह्याच कारण आत्ताच ICU मध्ये असणार्या आपल्या पृथ्वीला वाचवण्यासाठी मानवाच्याहाती मोजून दहा-पंधरा वर्षांचाच कालावधी आहे. (कारण काहि शास्त्रज्ञांच्यामते त्यानंतर ग्लोबल वॉर्मिंगची स्थिती मानवाच्या शक्ती पलीकडे गेल्याने त्यापुढे पृथ्वीस वाचवण्यासाठी मानवाच्याहाती काहिच रहाणार नाहि.) आणि ह्यावर ऊपाय म्हणून प्रगत आणि विकसनशील देशांनी आपापल्या प्रदुषणावर मोठ्या प्रमाणात नियंत्रण आणण्यासारखी पावल खुप वेगाने ऊचलण्याची गरज आहे. पण नेमक्या अश्यावेळेस जगातील दुसर्या क्रमांकाचा देश असणार्या अमेरिकेच्या ह्या राष्ट्रपतींनी आपली सर्व जबाबदारी झटकून (जगाच्या हितासाठी बराक ओबामांनी मान्य केलेल्या अटी-शर्ती लाथाडून) ग्लोबल वॉर्मिंगच्या युध्दातून सपशेल माघार घेतली आहे. म्हणजेच ह्यापुढे प्रदुषण थांबवण्यासाठी 1% हि मदत न करता आता अमेरिका नवीन ऊत्साहाने कैकपटीने प्रदुषण करू लागेल. मित्रांनो त्याचा तापमानवाढ,हवामानबदल आणि एकुणच भारतावर काय परिणाम होऊ शकतो ह्याची कल्पना तुम्ही करू शकता. मित्रांनो अस म्हणतात जो संकटसमयी मदत करतो तोच मित्र आणि संकटसमयी घात करणारा क्षत्रूहुनहि भयानक असतो. हे ट्रम्प साहेब आणि आपले पंतप्रधान मोदिजींची मैत्री जगजाहिर आहे. त्यामुळेच मोदि साहेबांनी ह्याबाबतचा निर्णय बदलण्यासाठी ट्रम्प साहेबांना समजावण्याचे भगीरथ प्रयत्न करणे गरजेचे आहे. आणि असे झाल्यास त्यानंतर ट्रम्प त्यांचे म्हणजेच पर्यायाने भारताचे मित्र आहेत की कोण ते कळेल. मी असे म्हणतोय कारण मित्रांनो ग्लोबक वॉर्मिंगच्या युध्दात भारताच्या आणि जगाच्याहि दृष्टीने अमेरिकेची भुमिका खुप महत्वाची आहे. कारण ग्लोबल वॉर्मिंगचा हा राक्षस बनवण्यात सर्वात मोठा वाटा अमेरिकेचाच आहे. पण ह्या युध्दात अमेरिकेची ती भुमिका कोणती ?

क्रमश :

- मकरंद सुधाकर पाटोळे.


बुधवार, २० डिसेंबर, २०१७


कळी अलगद पहिल्या प्रेमाची शीतल दवबिंदुंनी खुलते |

शहारूनी  भावना मनातील कवितेचे  हे  फुल  ऊमलते |


सोनेरी  स्वप्नांची  किरणे  पाकळ्यांवरी  हळूच  विसावून |

सुगंध  हृद्यातील  कवितेच्या  हसतो  विश्वाचे  मन  मोहून |


काळरूपी  परी  चित्रकार  हा  ह्या  विश्वाचा  असतो  लहरी |

कुंचल्यातुनी  रंग  बदलुनी  चाल  खेळतो  हा  मग  गहिरी |


रेघ  ओढुनी  मग  विरहाची  हा  दोघांचे  विश्व  दुभंगतो |

भावविश्व  अंधारून  तो  मग  गर्दिमध्ये  स्वत:  हरवतो |


अडखळूनी  ठेचाळून  घेतो  परी  हा  अखेर  शोध  स्वत:चा |

स्वप्नांच्या  क्षितीजाला  पहाता  पुन्हा  पाय  अडतो  दृष्टीचा |


गर्दितुन  पहिल्या  प्रेमाची  आठवण  ह्याला  खुणवून  जाते |

हृद्यातुन  मग  शब्द  ऊमटतो  काय  रे  ती  सध्या  काय  करते ?

- मकरंद सुधाकर पाटोळे.

...........मातृत्व..­.............




पाहून इवला जीव चेव
त्या गर्दीच्या झंझावाताला |


नेत्रातील 'थरथरती'
ज्योती शोधत
असता त्या 'हाताला' ||धृ.||




तळपत होता सूर्य शिरावर पेटवूनी भूमी वैराण |


कळप मृगांचा 'निष्ठूर' सोडून मागे ती हरिणी गतप्राण |


पाडस परी अडखळले मागे पाहून निपचीत त्या मातेला | नेत्रातील...||1
||



जीव भुकेने व्याकुळ त्याचा अजाण बिलगे तिच्या शवासी |


मायेचा तो 'पाझर' परिचीत
का परका ?
ना कळूनी त्यासी |


ऊब
शोधूनी ना सापडली 'मायेची' परी त्या पिल्लाला | नेत्रातील ...||2||




'मृत्यू हुंगून' येत गिधाडे पाडसास हुसकविले त्यांनी |


शवास वेढून लचके तोडून जणू 'ममतेसी'
गेली गिळूनी |


पाहूनीच गहिवरले पिल्लू मग 'मायेच्या'
सांगाड्याला | नेत्रातील...||3||



मातेवीण पोरके हरवले एकांती हे पाहून
पाडस |


'मृत्यूला' रुपात चित्त्याच्या हमला करण्याचे मग धाडस |


आळवित असता मातेला मृत्यू गिळूनी ह्या पिल्लाला | नेत्रातील ....||4||




कुठे ऊपाशी तळमळणार्या पिल्लाने मातेसी हळहळ |


सिंहांच्या गर्जना सभोवती परी जिंकून हृद्यातील तळमळ |


आली सोपवूनी ते पिल्लू
'आई'
बिबट्याची झाडाला | नेत्रातील...||5||




दृष्टीआड तिज होता पिल्लू सिंहांची 'कुदृष्टी' तिजवर
|



'स्पर्धक' समजून
ह्या मातेला हल्ला हिंसक मग 'ममतेवर' |


रक्ताच्या थारोळी 'स्पंदन' विझले आठवूनी 'बाळाला' | नेत्रातील...||6||





पिल्लाची मग हाक
होऊनी इथे
'पोरकी' प्रतिसादावीण |


मातेसी शोधण्या भटकता ऊघड्यावरती हे छायेवीण |


कुत्र्यांनी मग त्यास वेढूनी लाजविले
त्या 'निर्द्यतेला' | नेत्रातील...||7||




दूरचित्रवाणीवर भयाण
ह्या सत्याला स्वत: पाहूनी |


रडे माय 'बाळावीण'
आशा जिला लावली विज्ञानानी |


वाचा फुटली मग
तिच्यातल्या त्या रडणार्या 'मातृत्वाला'| नेत्रातील...||8||




"प्रेम-भावना परक्या म्हणतो आपण ह्या प्राणीजगताला |


परी 'ममतेचा श्वास'
जगवितो ह्या पिल्लांच्या 'अस्तित्वाला' |


मानवात म्हणूनी तर आई नावच दुसरे 'मातृत्वाला'| नेत्रातील...||9||




जीव जिचा त्या बाळामध्ये 'श्वासासम'
त्या हृद्यी धरूनी |


दु:खाच्या चटक्याला जाते हिचीच फुंकर
'शीतल' करूनी |


कोलमडूनी पडता स्पर्शातून देते बळ ह्याच्या 'धैर्याला' | नेत्रातील ...|| 10||




'पिल्लाची वेदना'
सांगती व्रण खोल
तिच्याच 'हृद्याचे' |


रोग हरे जी बाळाचा त्या स्वास्थ्य अर्पूनी त्यास 'स्वत:चे' |


साद स्पंदनाची गुदमरते 'ह्याची'
मुकुनी 'प्रतिसादाला' | नेत्रातील...||1
1||




बळ पंखातील वाढून
ऊडूनी मागे सारून
त्या क्षितीजाला |


जरी पिल्लाचे हृद्य विसरले मायेच्या मंजुळ हाकेला |


परी 'आईचा'
श्वासही 'अंतिम' साद
घालूनी जातो ह्याला | नेत्रातील...||1
2||


.
'साद' कुठे
इवल्या हृद्याची आईच्या हृद्याला 'बिलगून' |


धडकी भरणार्या बुरूजाला गेली आई 'थिटेच' ठरवून |


'अहंकार' गळला बुरूजाचा पाहून 'ममतेतील शक्तीला' | नेत्रातील...||13||





म्हणूनी लक्ष माता- भगिनींची जडली ज्यांच्या ठायी भक्ती |


स्वत: त्याच शिव
छत्रपतींनी ममतेतील ऊलगडण्या शक्ती |


हिचे नाव देऊन बुरुजाला केले वंदन ह्या 'ममतेला' |नेत्रातील...||14||




वसे तीच
ममता स्त्री हृद्यी जी बाळावीण कधी 'पोरकी' |


'हाक'
अनाथालयातल्या त्या बाळांची तिज नव्हती 'परकी' |


मिळे 'ऊब मायेची' मग
त्या थरथरत्या इवल्या पिल्लाला |
नेत्रातील...||15||




'विज्ञानाचे हात' अर्पिता रक्ताचे नाते त्या स्त्रीला |


अनाथ बाळाचा का 'टाहो' ध्वनीत ह्या 'प्रगतीच्या' दबला ? |


'हरिणाच्या पिल्लासम' का मग आज दिशा ह्या गिळतील ह्याला ?| नेत्रातील...||16||




'बिबट्याच्या पिल्लासम' हरवून इथे मुकुन त्या 'प्रतिसादाला' |


केविलवाणे ठरून गिळेल का 'निर्द्यता' ह्या बाळाला ? |


हृद्यी भिडेल कधी हाक
की ह्या 'आधूनिक
हिरकणीला' ? |
नेत्रातील...||17||




'आप-पर'
भावाची दरी ती हिचे
पाय
का ओढिल मागे ?|


थिटी ठरवूनी जाईल
दरीस कि जुळवून
'मायेचे धागे' ? |


मिळेल का 'प्रेमाचा' पाझर ह्या 'व्याकुळलेल्या' पिल्लाला ? |" नेत्रातील...||18||





हृद्यामधल्या 'मातृत्वाच्या' ह्या प्रश्नांनी विचलीत होऊन |


दूरून 'पोरक्या' बाळाची मग साद 'हिला' गेली हेलावून |


'अपुले-परके' दरी मध्ये
जी दिसली 'क्षूल्लक
ह्या आईला'|


नेत्रातील 'थरथरती'
ज्योती शोधत
असता त्या 'हाताला' ||19||




-मकरंद सुधाकर पाटोळे.

शुक्रवार, १५ डिसेंबर, २०१७


..........  परोपकारी !  ...........


पोट  स्वत:चे  भरता  वनस्पती  विश्वाला  जगवून  जाते |

भरल्यापोटि   मानवप्रगती  का  ईतरांचा  घास  ओढते  ?  || ध्रू .||



वसुंधरेच्या  हाती  ऊरती  माती  ज्याच्या  अस्तित्वावीण |

नावच  त्याचे  " जीवन "  कारण  अशक्य  हे  जीवन  पाण्यावीण |

प्राणवायुच्याशिवाय  पण  का  हे  पाणीहि  जीवन  ठरते  ?
| भरल्यापोटि ... || 1 ||



जसा  श्वास  हृद्याला  तशीच  ऊर्जा  आवश्यक  सृष्टीला |

सहस्त्र  किरणांतुनी  जरी  हा  रवी विखुरतो  ह्या  ऊर्जेला |

सृष्टीच  असती  जर  हाताविण  दान  तिच्या  का  हाती  ऊरते ?
| भरल्यापोटि ... || 2 ||



दिला  अर्थ  सुर्याला  अन  जणू  ह्या  पाण्याला  वनस्पतींनी |

सुर्याच्या  ऊर्जेला  सांधुन  पर्णरूपी  अनंत  हातांनी |

प्राणवायु  पाण्याचा  गुंता  त्या  हातांनी  हि  सोडवते |
भरल्यापोटि ... || 3 ||



मंथन  करते  जणू  पाण्याचे  रेणूंच्या  बंधास  ऊलगडून |

करूनी  मुक्त  मग  प्राणवायुला हायड्रोजनला  धरते  रोखुन |

कारण  स्फोटक  स्वभाव  त्याचा  वनस्पतीहि  जाणून  असते |
भरल्यापोटि ... || 4 ||



स्वभावसंसर्गाने  होईल  प्राणवायु  विध्वंसक  जाणून |

गिळूनी  हायड्रोजन  अन  शोषुन  कर्बवायुलाहि  सृष्टीतुन |

 विषास  गिळता  "वनस्पती" मग      श्वास  मोकळा  "सृष्टी" घेते |
भरल्यापोटि ... || 5 ||

अमृत  मिळते  " विषास  पचवून "  जणू  हे  वनस्पतीला  ऊमगुन |

गिळूंनी  वायुंना  ह्या  मिसळून  स्वभाव  त्यांचा  परस्परांतुन |

विषातुनी  " ऊर्जेचे  अमृत "  विश्वाकरता  हिच  घडवते |

भरल्यापोटि  मानवप्रगती  का  ईतरांचा  घास  ओढते  || 6 ||

- मकरंद सुधाकर पाटोळे.

शनिवार, ७ मे, २०१६

....... // घड्याळ \\ …….

               

वेळ  सांगते  घड्याळ  की  ह्या  विश्वातील  सत्याचे  सार |

घड्याळात  पहाताना  करूया  आपण  ह्याचा  जरा  विचार  ||धृ.||

जणू  सत्याचे  भान  हरवूनी  चित्त  वेधण्या  ऊनाड  धडधड  |

पुढे  राहण्यासाठी  केवळ सुरूच  ज्याची  बाष्कळ  धडपड  |

सेकंद  काट्याच्या  वृत्तीचे  विवेकबुध्दीशी  जणू  वैर  |           घड्याळात … || 1 ||

ठाम  स्वत: जो  निर्धारावर  नसे  भय  त्याला  स्पर्धेचे  |

पाऊल  त्याचे  भान  देऊनी  जाते  विश्वाला  काळाचे  |

म्हणूनी  करते  जणू  बुध्दीहि  मिनिटाच्या  काट्याचा  आदर  | घड्याळात… || 2 ||

शर्यतीत  ह्या  मागे  जो  तो  अढळ  आपुल्या  ध्येय्यावरती  |

तार्यासम  तो  कारण  फिरते  विश्वची  अवघे  ह्याच्याभोवती  |

ठसा  ऊमटवून  जाते  अपुला  कोण  ह्यातले  मग  विश्वावर  ?

घड्याळात… || 3 ||

त्रिकोण  काट्यांचा  आवश्यक  तोल  साधण्यासी  काळाचा  |

हात  पकडण्या  ह्या  काळाचा  वारू  आवश्यक  प्रगतीचा  |

ऊधळून  घोडा  पण  मग  झाले  कोण  आज  कोणावर  स्वार  ?

घड्याळात  पहाताना  करूया  आपण  ह्याचा  जरा  विचार  || 4 ||

- मकरंद  सुधाकर  पाटोळे  कदम.

.......शंकाग्रस्त बीज !........

जीवनदायी  रक्षणकर्त्यांचा  जर  घातच    प्रघात  ईथला |

ईतरांसाठी  विशाल  होऊ  का  मी  कवटाळून  मृत्युला ? || धृ.||

क्षितीजाचेहि  नसते  बंधन  शापित  भूमी  अथांग  ऐशी  |

रक्त  जळून  छायेवीण  जिकडे  सांगाड्यांच्या  अगणित  राशी  |

अनंत  वर्षे  शाप  भोगुनी  फुटे  पालवी  मग  धरणीला  | ईतरांसाठी ...|| 1 ||

करूणामयी  मग  रोप  ऊगवते  हिमालयाचे  धैर्य  अंतरी  |

वार  झेलुनी  ते  सृष्टीचे  रोप  पसरते  परोपकारी  |

श्वास  पाहूनी  तडफडणारे  रोप  घडविते  वटवृक्षाला | ईतरांसाठी ...|| 2 ||

छाया  ह्याची  बनते  घरकुल  जणू  श्वास  हा  प्रत्येकाचा  |

मरूभुमीतील  तृष्णेसाठी  जणू  निर्झर   हा  चैतन्याचा  |

कल्पवृक्ष  हा  आनंदाचा का   खुपतो  मग  त्या  दैवाला ?  ईतरांसाठी ...|| 3 ||

झंझावाती  येऊन  तांडव  प्रलयमेघ  त्या  नभास  गिळूनी  |

थरथरती  मग  दहा  दिशा हि  ईथे  दामिनींच्या  नृत्यानी  |

ढाल  बनवूनी  तरू  स्वत:सी  धरतो  हृद्यी  प्रत्येकाला  | ईतरांसाठी ...|| 4 ||

निर्भय  ऊंच  तरू  हा  पाहून  अहं  ठेंगणा  नभी  विजेचा  |

नखशिखान्त  पेटूनी  दामिनी  प्राण  जाळूनी  जाते  ह्याचा  |

बीज हि  जळते  जमिनीमध्ये  प्रश्न  विचारून  हाच  स्वत:ला  |

ईतरांसाठी  विशाल  होऊ  का  मी  कवटाळून  मृत्युला ? || 5 ||

- मकरंद सुधाकर पाटोळे कदम.